मुख्य पृष्ठ दैनिक राशिभविष्य (Daily Prediction)
27 नोव्हेंबर 2015
दैनिक राशिभविष्य
 
खेळाडू व राजकारणींना यश मिळणं कठीण जाईल. अर्थात शुक्र , राहू व हर्षल अनुकूल असल्याने आथिर्क समस्या व अन्य प्रसंगांवर मात कराल.
 
 
नोकरी-धंदा व अन्य व्यवहारातून भरपूर धन मिळेल. बढतीचा योग येईल. बराच खर्च करावा लागेल. मन प्रसन्न राहील.
 
 
ठरवल्याप्रमाणे सर्व कामं पूर्ण होतील. व्यवसाय-धंद्यातून चांगली धनप्राप्ती होईल. चांगलं कौटुंबिक सुखही मिळेल. ओळखींचा फायदा होईल. नावलौकिक मिळेल. चुका न होऊ देण्याची काळजी घ्यावी लागेल.
 
 
आजार बळावण्याची शक्यता आहे. कार्यात अडचणी येतील पण त्या दूर पण होतील. धनस्थिती ठीक राहील. प्रयत्न करणे सोडू नये.
 
 
सतत खर्च करावा लागेल. उष्णतेचे विकार होणार नाहीत याची काळजी घ्या. कोणावर आरोप करू नका. धन- सुख मिळेल. व्यवहारिकपर्ण वागावे.
 
 
पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होतील. वाहनलाभ व स्थानलाभ मिळेल. हाती घ्याल त्या कार्यात यश मिळेल. मोठ्यांचे आशिर्वाद लाभतील. विवादीत कार्य पार पडतील.
 
 
भांडणं बंद होतील. सर्व कार्यात यश मिळल्याने चिंता दूर होतील. पती-पत्नीत काही मतभेद होतीलच. प्रकृती अस्वास्थ्यही निर्माण होईल. परिवाराकडे लक्ष द्यावे.
 
 
वृश्चिक
आजारपणात खूप खर्च होईल. त्यामुळे शिल्लक राहणार नाही. चांगलं गृहसौख्य मिळणार असलं तरी घरातल्या मंडळींच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. जबाबदार्‍यांमध्येही वाढ होईल.
 
 
घरात कलह निर्माण होईल. त्यावर संयमाने नियंत्रण ठेवा. स्थावर इस्टेटीसंबंधीचे प्रश्न निर्माण होतील. सुख व धन प्राप्तिचे योग आहे.
 
 
मोठ्या प्रमाणात आथिर्क लाभ होईल. घरात आनंदी वातावरण राहील. कलेच्या क्षेत्रात नावलौकिक मिळेल. काही अडचणींना तोंड देणे भाग पडेल.
 
 
कर्तबगारी दाखवण्याची चांगली संधी मिळेल. धनस्थितीही चांगली राहील. घरात काही मतभेद निर्माण करतील. कठोरपणाने बोलून वाद वाढवू नका.
 
 
कसलीच चिंता असणार नाही. नोकरी-धंदा वा इतर मार्गांनी भरपूर धन मिळेल. आथिर्क गुंतवणुकीस उत्तम काल आहे. प्रापंचिक सुख तर मिळेलच शिवाय नावलौकिकही मिळेल.